Shree Saptshrungi Ayurved Mahavidyalay

नाशिक शहरातील पंचवटीतील सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाने १४ वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भव्य इमारत, १२५ बेडचे सुसज्ज रुग्णालय, वनौषधीउद्यान, आयुर्वेदातील पहिली डिजिटल लायब्ररी ही या महाविद्यालाची वैशिष्ट्ये असून लवकरच महाविद्यालयात आयुर्वेदाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे सप्तशृंगी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर यांनी सांगितले. १९९९ साली कॅनडा कॉर्नर येथे छोट्या जागेत सुरु झालेल्या या महाविद्यालयाने आता उत्तुंग झेप घेतली आहे. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेते. रुग्णालयामध्ये सुसज्ज असे ३ शस्त्रक्रिया विभाग कार्यरत आहेत. स्वतंत्र आय. सी. यु. कक्ष, एक्स-रे, सोनोग्राफी ची सोय असून आणखी अत्याधुनिक साधनसामुग्री आणण्याचा मानस असल्याचे डॉ. आहेर यांनी स्पष्ट केले.

  • Estd:1999
  • Affiliated to the Maharashtra University of Health Sciences
  • Recognised by the State Government of Maharashtra & C. C. I. M. New Delhi